दरेकरांच्या मनात कोणताही अश्लील अर्थ नाही; चंद्रकांतदादांकडून पाठराखण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेस हा रंगलेल्या गालाचे मुके घेणारा पक्ष आहे. असं वादग्रस्त वक्तव्य भाजप नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी केल्यानंतर राष्ट्रवादीकडून दरेकरांवर टीकेची झोड उठवली जात आहे. परंतु दरेकरांच्या मनात कोणताही अश्लील अर्थ नाही अस म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दरेकरांची पाठराखण केली आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले, प्रवीण दरकरांच्या विधानावरून इतका गदारोळ करण्याची गरज नाही. दरेकरांच्या मनात कोणताही अश्लील अर्थ नाही. तसं काही कारणच नाही. राष्ट्रवादी उगाच वेड पांघरून पेडगावला जात आहे. आपण दररोजच्या बोलण्यात वाक्यप्रचार वापरत असतो. त्यामुळे उगीच पराचा कावळा करु नये. त्याचा अर्थ वेडावाकडा घेऊ नये अस चंद्रकांत पाटील म्हणाले.

नेमकं काय आहे प्रकरण-

प्रसिद्ध लावणी नृत्यांगणा सुरेखा पुणेकर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय. येत्या 16 सप्टेंबरला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सुरेखा पुणेकर राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. त्यांच्या पक्षप्रवेशावर टीका करताना दरेकर बोलता बोलता भलतंच बोलून गेले.  राष्ट्रवादी रंगलेल्या गालांचा मुका घेणारा पक्ष आहे, असं वक्तव्य त्यांनी केलं.

You might also like