उद्धव जी, स्वतःचे अपयश झाकण्यासाठी पंतप्रधानांना हात जोडण्याचे नाटक कशासाठी – चंद्रकांत पाटील

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन |  मराठा आरक्षण कायदा रद्द करताना सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला आहे त्यात मराठा आरक्षणाचा अधिकार केंद्र सरकारचा आणि राष्ट्रपतींचा असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. त्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पलटवार करत मुख्यमंत्री आणि काँग्रेस- राष्ट्रवादीवर निशाणा साधला.भारतीय जनता पार्टी ने हे आरक्षण दिले होते. त्याला यश मिळू नये,भाजपला क्रेडिट मिळू नये म्हणून मराठा समाज्याच्या तरुण-तरुणींचा तुम्ही बळी देताय का असा सवाल चंद्रकांत पाटलांनी केला.

उद्धव जी, स्वतःचे अपयश झाकण्यासाठी हात जोडून पंतप्रधानांना प्रार्थना करतो, असे नाटक तुम्ही का करत आहात? ज्यांच्यासोबत मांडीला मांडी लावून बसला आहात त्यांना मराठा समाजाला आरक्षण देण्याची इच्छाच नाही आणि यासाठी केवळ तुम्हीच जबाबदार आहात’, अस चंद्रकांत पाटील यांनी म्हंटल.

उद्धवजी तुम्ही ज्यांच्या मांडीला मांडी लावून बसला आहात त्यांना तुम्ही अजून ओळखलं नाही. त्यांना जर मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असत तर यापूर्वी का नाही दिलं असे म्हणत शिवसेना सुद्धा केवळ सत्तेच्या लालसेपोटी काँग्रेसच्या या कारस्थानात सामील झाली आहे, हे अतिशय वेदनादायी आहे’, असेही पाटील म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

You might also like