संजय राऊत हे वर्णन करण्यापलीकडचे व्यक्तिमत्व, मी त्यांच्यावर पुस्तक लिहितो – चंद्रकांत दादांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी देशातील स्थिती युद्धजन्य झाली असून दोन दिवसांचे खास अधिवेशन घ्यावे, अशी मागणी केली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राऊतांना जोरदार टोला लगावला आहे. संजय राऊत हे वर्णन करण्यापलीकडचे व्यक्तिमत्व असून मी राऊतांवर पुस्तक लिहितो असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला.

पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलताना चंद्रकांत दादांनी राऊतांना खोचक टोला लगावला आहे. ‘शरद पवारांवर पीएचडी, अजित पवारांवर एमफिल सुरु आहे. आता संजय राऊतांवर पुस्तक लिहितो. ते वर्णन करण्यापलीकडचे व्यक्तिमत्व आहेत. राऊतांनी मागणी करावी आणि मोदींनी मान्य करावी,’ असं भाष्य चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.

You might also like