महापालिका निवडणुकीत मुंबईकर शिवसेनेला जागा दाखवून देतील- चंद्रकांत पाटील

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | येत्या काही दिवसानंतर मुंबई महापालिका निवडणुकीची रणधुमाळी रंगणार असून भाजप आणि शिवसेनेमध्ये जोरदार टक्कर सुरू आहे. याच दरम्यान आगामी महापालिका निवडणुकीत मुंबईकर शिवसेनेला जागा दाखवून देतील अस वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसाच्या त्यानिमित्ताने एका छोटेखानी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी मीडियाशी बोलताना त्यांनी हा इशारा दिला.

चंद्रकांत पाटील म्हणाले, हजारो कोटींचा खर्च करूनही मुंबईतील नालेसफाईचा प्रश्न सुटत नाही. मी सुद्धा काल मुंबईत अडकलो होतो. मुंबई तुंबई होतेय हे खरं आहे, असं सांगतानाच येत्या पालिका निवडणुकीत मुंबईकर शिवसेनेला जागा दाखवून देतील’, असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.

दरम्यान, माझ्या वाढदिवसानिमित्ताने मी नेहमी काही तरी वेगळं करत असतो. रिक्षाचालकांना कुपन, रेशन किट वाटप केले. तीन हजार लोकांना हे वाटप केलं. वंचित घटकांसाठी मोफत लसीकरण सुरू केलं आहे. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी त्यात भाग घेतला आहे, असं पाटील म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

Leave a Comment