मराठा समाजाला आरक्षण द्या,नाही तर परिणामांना समोरे जा ; चंद्रकांतदादांचा सरकारला गंभीर इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा जोरदार चर्चेत असून याच मुद्द्यावरून राजकीय वातावरण मात्र ढवळून निघाले आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधी पक्ष भाजप सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहे. दरम्यान भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी आता सरकारला गंभीर इशारा दिला आहे.

मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयासमोर अभ्यासपूर्ण बाजू मांडण्यास राज्य सरकार अपयशी ठरले आहे, असं सांगतानाच मराठा समाजाला आरक्षण द्या, नाही तर परिणामांना समोरे जा, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला.

मराठा आरक्षणाचा विषय जेव्हा मुंबई उच्च न्यायालयात गेला होता. तेव्हा तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने उच्च न्यायालयाला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा दाखला देत उच्च न्यायालयाला कन्व्हिन्स केलं होतं. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षणही मिळालं आणि मागासवर्ग आयोगाला मंजुरीही मिळाली. मात्र, हीच गोष्ट सर्वोच्च न्यायालयाला कन्व्हिन्स करण्यात राज्य सरकार अपयशी ठरलं आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

You might also like