व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

भाजप महाराष्ट्रात ‘या’ जागेचा उमेदवार बदलणार?

जळगाव प्रतिनिधी ।वाल्मिक जोशी

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम अंतिम टप्प्यात आला असला तरी अजूनही काही ठिकाणी उमेदवार निवडीवरून वाद सुरू आहेत. उत्तर महाराष्ट्रात भाजपच्या एका जागेबद्दल पुनर्विचार होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे दोन जागांवरच्या उमेदवारांना नाराज नेत्यांनी आव्हान दिले आहे.

जळगावमध्ये उमेदवार बदलणार ?

जळगाव हा भाजपचा बालेकिल्ला आहे. या मतदारसंघात विद्यमान खासदार ए.टी. पाटील यांचे तिकीट कापून आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. स्मिता वाघ यांनी उमेदवारी अर्जही भरला आहे. परंतु येथील उमेदवार बदलला जाण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. या राजकीय घडामोडीमुळे भाजपच्या निर्णय क्षमतेवर देखील प्रश्न चिन्ह उपस्थित केले जावू लागले आहे. तर पडद्याआडून होणाऱ्या या राजकीय बदलाची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगू लागली आहे.

दरम्यान उदया उमेदवारी दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. म्हणून स्मिता वाघ यांच्या जागी आमदार उन्मेष पाटील आणि प्रकाश पाटील यांना उमेदवारी देण्याबद्दल भाजपचा विचार सुरू आहे. उन्मेष पाटील हे चाळीसगावचे विद्यमान आमदार आहेत तर प्रकाश पाटील हे जळगावकर आहेत.या तिघांपैकी नेमकी कुणाची उमेदवारी अंतिम होणार याचा निर्णय आज रात्री घेतला जाण्याची शक्यता आहे.