“शिवसेना जाणत्यांच्या खांद्यावर आणि काँग्रेसच्या मांडीवर” ; लव्ह जिहाद वरून भाजपचा टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मागील काही दिवसांपासून लव्ह जिहाद विरोधात देशातील वातवरण चांगलेच तापत असल्याचे दिसत आहे. उत्तर प्रदेश, हरियाणा पाठोपाठ आता कर्नाटकमध्येही लव्ह जिहाद विरोधात कठोर कायदा करण्याचा विचार सुरू आहे. त्यातच आता महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी लव्ह जिहादबाबत कायदा करण्याबद्दल मागणी केली आहे. शिवसेनेची भूमिका मांडण्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या ‘सामना’ वृत्तपत्रामध्ये लव्ह जिहादवर एआयएमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केलेल्या टीकेच्या वृत्तांकनावरुन आता भाजपाने शिवसेनेवर निशाणा साधला आहे

भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी सामनामध्ये छापून आलेल्या ओवेसींच्या वक्तव्याच्या बातमीचे कात्रण ट्विटरवरुन शेअर केलं आहे. ‘लव्ह जिहादविरोधी कायदा राज्यघटनेचे उल्लंघन ठरेल’ या मथळ्याखाली ओवेसींच्या फोटोसहीत छापून आलेल्या बातमीचा फोटो पोस्ट करत, “ज्वलंत हिंदुत्ववादी शिवसेनेच्या महापौरांनी लव्ह जिहादचे समर्थन केल्यानंतर आज सामानात ओवेसीची ही बातमी छापून आली आहे. लव्ह जिहाद रोखण्यासाठी इस्रायल सारखे कायदे करा असे अग्रलेख लिहणारा सामना आणि शिवसेना जाणत्यांच्या खांद्यावर आणि काँग्रेसच्या मांडीवर नव्या ब्रिगेडी वळणावर आली आहे,” असा टोला लगावला आहे. या ट्विटमध्ये जाणता शब्दाचा उल्लेख करत भातखळकर यांनी अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या खांद्यावर बसून शिवसेना ही भूमिका घेत असल्याची टीका केली आहे.

काय म्हणाले होते ओवेसी-

एमआयएमचे अध्यक्ष खासदार ओवेसी यांनी लव्ह जिहाद कायद्यावरून भाजपाला सुनावलं आहे. “विशेष विवाह कायदा रद्द केल्यास घटनेतील कलम १४ व २१ मोठं उल्लंघन होणार आहे. त्यांनी घटनेचा अभ्यास करायला हवा. द्वेषाचा प्रसार आता काम करणार नाही. बेरोजगारीचे बळी ठरलेल्या तरुणांचं लक्ष विचलित करण्यासाठी भाजपा नाटक करतंय,” अशा शब्दात ओवेसी यांनी भाजपावर निशाणा साधला होता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment