‘त्या’ क्लिप्स खऱ्या की खोट्या?? ; परखड सवाल करत फडणवीसांकडून मुख्यमंत्र्यांच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिला असला तरी विरोधी पक्ष भाजपचे समाधान झालेलं नाही. दरम्यान विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पूजा चव्हाण प्रकरणावरून पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अवस्था अत्यंत केविलवाणी होती. कोणत्याही मुख्यमंत्र्यांची इतकी केविलवाणी अवस्था पाहिली नाही. या प्रकरणातील क्लिप्स खऱ्या की खोट्या हे मुख्यमंत्र्यांनी सांगाव्यात, असं आव्हान देतानाच कुणाला साधूसंत ठरवायचे असेल तर जरूर ठरवा, पण तुमच्या नैतिकतेचं काय? असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला

मुख्यमंत्र्यांनी फक्त एवढं सांगावं, की बाहेर आलेल्या ऑडिओ क्लिप्स खऱ्या आहेत की खोट्या? यवतमाळच्या मेडिकल कॉलेजमध्ये घडलं ते खरं की खोटं? माध्यमांनी जे काही बाहेर काढलंय, ते खरं की खोटं? पण एवढं झाल्यावरही जर कोणाला साधूसंत ठरवायचंच असेल, तर जरूर त्यांनी ठरवावं. यातून तुमची नैतिकता काय आहे हे जनतेसमोर येतं”, असं फडणवीस म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

You might also like