Sunday, April 2, 2023

राज्यपालांच्या प्रामाणिक कामामुळे काहींना मळमळ; फडणवीसांचा आघाडीला टोला

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी  महाराष्ट्रातील काही जिल्ह्याच्या दौरा करत आढावा घेत आहेत. यावरून महाविकास आघाडी आणि राज्यपाल यांच्यातील वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. राज्यपाल कोश्यारी हे राज्य सरकारच्या कामात हस्तक्षेप करत असून दोन सत्ताकेंद्र तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप ठाकरे सरकारने केल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

फडणवीस म्हणाले, राज्यपालांना दौरे करू नका असं कोणीच सांगू शकत नाही. पीसी अलेक्झांडर आणि एस. सी. जमीर या माजी राज्यपालांनी त्यावेळी एकूण एक जिल्ह्याचा दौरा केला होता, असं सांगतानाच राज्यपालांच्या दौऱ्यामुळे काही लोकांना मळमळ होत आहे. ही मळमळच बाहेर येत आहे, अशी टीका त्यांनी केली.

- Advertisement -

राज्यपाल हे प्रमुख आहेत आणि संविधानाने त्यांनी मुख्यमंत्री आणि मंत्रीमंडळाला सल्ला देण्यासाठी त्याठिकाणी तयार केलेलं आहे. त्यामुळे राज्यपालांना दौरे करु नका असं कोणी सांगू शकत नाही. राज्यपालांच्या दौऱ्यावरून ज्यांना मळमळ होते त्यांनी भारतीय संविधानाचं वाचन करावं आणि त्यानंतर अशी वक्तव्य करावी,” असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.