देशात ‘अमर-अकबर-अँथनी’ आनंदाने एकत्र नांदू नये हेच नेहमी भाजपला वाटतं; तांबेंचा दानवेंवर पलटवार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । भाजपा नेते रावसाहेब दानवे यांनी राज्यातील महाविकास आघाडीवर टीका करत अमर, अकबर, अँथनी पायात पाय घालून आपोआप पडतील असं म्हटलं होतं. दानवे यांच्या या विधानानंतर काँग्रेस नेते सत्यजीत तांबे यांनी रावसाहेब दानवेंच्या टीकेला उत्तर दिलं आहे. भाजपच्या स्थापनेपासून देशात अमर, अकबर, अँथनी कधी आंनदाने एकत्र नांदूच नये असं त्यांच्या नेत्यांना वाटतं आलं असल्याची बोचरी टीका तांबे यांनी ट्विट करत केली आहे.

सत्यजित तांबे आपल्या ट्विटमध्ये म्हणाले, ”भाजपाच्या स्थापनेपासूनच त्यांना हे वाटत आले आहे की, या देशात अमर-अकबर-अँथनी कधीही गुण्यागोविंद्याने आणि एकत्र राहू नयेत. द्वितीय सरसंघचालक गोळवलकर यांनीही बंच ऑफ थॉट्स मध्ये हीच शिकवण दिली आहे. इतिहास या गोष्टीचा साक्षीदार आहे. बाकी महाराष्ट्र विकास आघाडीची चिंता नसावी” अशा शब्दांत तांबेंनी दानवेंच्या विधानाचा समाचार घेतला.

दरम्यान, आज महाविकास आघाडी टिकेबरोबर रावसाहेब दानवे यांनी उद्धव ठाकरेंवर सुद्धा टीका केली आहे. राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याला निमंत्रण दिले तरीही रामभक्त म्हणून उद्धव ठाकरे अयोद्ध्येला जाणार का? असा सवाल त्यांनी उपस्थितीत केला. एवढंच नाही तर पहले मंदिर फिर सरकार असं म्हणणारे ठाकरे आथा पहले सरकार फिर मंदिर म्हणत आहेत असंही रावसाहेब दानवेंनी म्हटलं होतं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment