Monday, January 30, 2023

जर सगळं गावच करणार असेल तर सरकार काय करील? पडळकरांचा सवाल

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ग्रामीण भागातील कोरोनामुक्तीच्या कामाला प्रोत्साहन मिळावे आणि गावे लवकरात लवकर कोरोनामुक्त व्हावी यासाठी राज्य सरकारने कोरोनामुक्त गाव ही स्पर्धा आयोजित केली असून पहिल्या 3 ग्रामपंचायतींना अनुक्रमे 50 लाख रुपये, 25 लाख रुपये आणि 15 लाख रुपये याप्रमाणे बक्षीस दिले जाणार आहे. दरम्यान भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी यावरून ठाकरे सरकार वर जोरदार हल्लाबोल केला आहे. जर सगळं गावच करील तर सरकार काय करील? असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला.

गोपीचंद पडळकर म्हणाले, “आघाडी सरकारच्या नावाखाली शरद पवारांनी ‘येडं पेरलं अन् खुळं उगवलं’ अशी गत ठाकरे सरकारची झाली आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा कोव्हिड आणि लॅाकडाऊनमुळे पूर्णपणे मोडला आहे. घरातील कित्येक कर्ती माणसं मृत्यूमुखी पडलीत. यांचे अश्रू पुसण्याऐवजी तुम्हाला ग्रामीण जनतेच्या दु:खाची थट्टा करणारी स्पर्धा सुचतेय”.

- Advertisement -

खरंतर या 50 लाखांच्या बक्षीसांबद्दलही मला साशंकता आहे. कारण ज्या पत्रकारांचा कोविडमुळे मृत्यू झाला आहे, त्यांना जीआर काढून पन्नास लाखांची मदत करतो सांगणाऱ्यांनी एक रूपायचीही मदत तर केलीच नाही पण कुटुंबियांना साधी भेटही दिली नाही. ही स्पर्धा म्हणजे अशाच यांच्या’भूलथापांच्या मालिकेचा’ एक भाग आहे असेही पडळकरांनी म्हंटल

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.