Wednesday, February 8, 2023

कॉंग्रेसचे लाचार मंत्री काका-पुतण्यापुढे फक्त माना डोलवतायेत; पडळकर सोनिया गांधींकडे करणार तक्रार

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून ठाकरे सरकार आणि शरद पवारांवर सातत्याने टीका करणारे भाजप आमदार गोपीचंद पडळकर हे आता थेट सोनिया गांधींकडे काँग्रेस नेत्यांची तक्रार करणार आहेत. कॉंग्रेसचे लाचार मंत्री काका-पुतण्यापुढे फक्त माना डोलवतायेत असा आरोप त्यांनी यावेळी केला आहे. तुमचे मंत्री फुले-शाहू- आंबेडकरांच्या विचारानं किती काम करतात हे मी सोनिया गांधींना कळवणार आहे, असं पडळकर म्हणाले.

मा. शरदचंद्र पवार यांच्या पुढाकाराने स्थापित झालेलं सरकार किती बहुजनद्वेष्ट आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. यांना मराठा आरक्षणाविषयी, ओबीसींच्या राजकीय आरक्षणाविषयी व पदोन्नतीतील आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात कुठलेही पाऊल उचलण्याची घाई नाहीये, पण न्यायालयाच्या निर्णयाआधीच आपल्या मर्जीतील अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्याची लगबग उडालीये.

- Advertisement -

सत्तेचे वेसन बांधलेले कॉंग्रेसचे लाचार मंत्री काका-पुतण्यापुढे फक्त माना डोलवतायेत. मी लवकरच माननीय सोनिया गांधींना तुमचे मंत्री किती फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांशी प्रेरित होऊन सत्तेत काम करतात, याचे उद्बोधन करनार आहे. असे पडळकर यांनी म्हंटल.