व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

खानापूर नगरपंचायतीत भाजपला भोपळा; सत्ताधारी शिवसेना- काँग्रेसची सरशी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील नगरपंचायत निवडणूकांचे निकाल जाहीर झाले असून खानापूर नगरपंचायतीत गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या भाजपला एकही जागा मिळाली नाही. पडळकरांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती तरीही भाजपच्या हाती मात्र भोपळा लागला आहे.

खानापूर ग्रामपंचायतीची नगरपालिका म्हणून ही दुसरी निवडणूक गेल्या वेळेप्रमाणे तिरंगीच झाली. यामध्ये सत्ताधारी शिवसेना – काँग्रेसच्या पॅनेलने बाजी मारली. सत्ताधारी शिवसेना-काँग्रेसला 9 तर विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित जनता आघाडीला 7 जागा मिळाल्या असून, त्यांचा एक समर्थक अपक्ष निवडून आला. भाजपाने या निवडणुकीत भोपळाही फोडता आला नाही.

एकूण 17 जागांपैकी सत्ताधारी शिवसेना-कॉंग्रेसच्या पॅनेलचे नेतृत्व आमदार अनिल बाबर, सुहास शिंदे, पांडुरंग डोंगरे यांनी केले. यावेळी सत्ताधाऱ्यांना ९ जागा म्हणजे काठावरील बहुमत मिळाले आहे. आगामी पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निकाल महत्त्वपूर्ण मानला जात आहे.