भाजपमध्ये गेल्यापासून सगळं व्यवस्थित चाललंय, चौकशी होत नाही; हर्षवर्धन पाटलांच्या विधानाने खळबळ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ईडी, सीबीआय, आयकर विभाग यांचा उपयोग जाणून बुजून महाविकास आघाडीच्या नेत्यांना त्रास देण्यासाठी होत असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून होत असताना आता भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांचा 1 व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यात ते म्हणले की भाजपमध्ये गेल्यापासून सगळं व्यवस्थित चाललंय, चौकशी होत नाही त्यामुळे झोप शांत लागते.

त्याचं झालं असं की एका हॉटेलच्या उद्घाटन कार्यक्रमाला हर्षवर्धन पाटील मावळला गेले होते. मंचावर विविध पक्षाचे नेते हजर होते. आम्हालाही भाजपमध्ये जावं लागलं. तो निर्णय मी का घेतला तेवढं मला विचारू नका. ते काँग्रेसच्या नेत्यांना विचारा, असं ते म्हणाले. ‘पण आता भाजपमध्ये मी निवांत आहे. शांत झोप लागते. चौकशी नाही, फिवकशी नाही, काही नाही,’ अशी मिश्किल टिप्पणी पाटील यांनी केली.

कोण आहेत हर्षवर्धन पाटील-

हर्षवर्धन पाटील हे इंदापूरचे माजी आमदार तसेच काँग्रेसचे माजी मंत्री होते. विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी काँग्रेस ला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला. हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार यांच्यातील वैर तर संपूर्ण राज्याला माहीत आहे. राष्ट्रवादीला कंटाळून आपण काँग्रेस सोडून भाजपमध्ये जात असल्याचे त्यांनी त्यावेळी म्हंटल होत.

You might also like