Saturday, February 4, 2023

मंत्रीमहोदय मंत्रिपद हे फक्त नाचण्यासाठी नसतं ; हर्षवर्धन पाटलांचा राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना टोला

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मंत्रीमहोदय मंत्रिपद हे फक्त नाचण्यासाठी नसतं, तर लोकांची कामं करण्यासाठी असतं असं म्हणत माजी मंत्री आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी दत्तात्रय भरणे यांना टोला लगावला आहे. पाटील हे आज इंदापुर येथे माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी दत्तात्रय भरणे यांनी सोलापूर येथे केलेल्या वक्तव्याचा संदर्भ जोडत हा टोला लगावला आहे.

मंत्रिपदे हे मिरवण्याची गोष्ट नाही. त्याचा उपयोग आपल्या भागातील लोकांना तसेच सर्वसामान्य माणसांना किती होतो? हा खरा महत्त्वाचा विषय असल्याचं राष्ट्रवादीचे आमदार आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोलापुरात म्हटलं होतं. याच वक्तव्यावरून भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी भरणेंवर निशाणा साधला आहे.

- Advertisement -

सोबतच आम्ही पाहतोय किती कामं होत आहेत.१४ कोटी जनतेपैकी फक्त ४० ते ४२ लोकांना मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळते.त्याचा कसा वापर होतोय हे आम्ही उघड्या डोळ्यांनी बघतोय. मंत्री महोदय मंत्रिपदाचा उपयोग लोकांच्या हितासाठी करायचा असतो. दुर्दैवाने सध्याच्या सरकारमध्ये तशी लोकं दिसत नाही, असं म्हणत हर्षवर्धन पाटलांनी महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर निशाणा साधला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’