भाजपतर्फे विधान परिषदेसाठी पंकजा मुंडे, सदाभाऊंना उमेदवारी नाही?; ‘या’ नावांवर शिकामोर्तब

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात येईल, असे वाटले होते. मात्र, भाजपने त्यांना उमेदवारी दिलेली नाही. त्यांच्याबरोबर सदाभाऊ खोत यांनाही उमेदवारी नाकारली असून त्यांच्या ऐवजी प्रविण दरेकर, प्रसाद लाड, उमा खापरे, राम शिंदे यांना उमेदवारी देण्यात आल्याची माहिती आहे. तर पाचव्या जागेसंदर्भात भाजपने निर्णय राखून ठेवला होता. मात्र, आता भाजपकडून श्रीकांत भारतीय यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे.

भाजपकडून राज्यसभेनंतर आता विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी तयारी केली जात आहे. भाजपतर्फे आज चार नावांवर शिकामोर्तब करण्यात आला. मात्र, पहिल्या यादीत पंकजा मुंडे, सदाभाऊ खोत, उमा खापरे यांचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे त्यांच्या नावाबाबत भाजपने अद्याप सस्पेन्स कायम ठेवला होता. पाचव्या जागेसाठी श्रीकांत भारतीय, पंकजा मुंडे व सदाभाऊ खोत यांच्यापैकी कुणाला उमेदवारी दिली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. परंतु जास्त करून श्रीकांत भारतीय यांच्या नावाची चर्चा केली जात असल्याने त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे.

विधान परिषदेच्या 10 जागांसाठी येत्या 20 जून रोजी निवडणूक पार पडणार आहे. याकरिता उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत 8 जून ही आहे. आज भाजपतर्फे उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आल्यानंतर संबंधित उमेदवार आज आपले उमेदवारी अर्ज आज दाखल करणार आहेत.

पंकजा मुंडे काय भूमिका घेणार?

परळी येथील बीडमध्ये गोपीनाथ मुंडे यांचा स्मृतीदिनाचा कार्यक्रम नुकताच पार पडला. यावेळी भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडावरून विधान परिषदेच्या उमेदवारीविषयी मोठे विधान केले होते. संधीसाठी रांगेत वाट पाहणं, ही माझी प्रवृत्ती नाही. मी कोणत्याही संधीची अपेक्षा करत नाही किंवा त्यासाठी प्रयत्नही करत नाही. पण विधानपरिषदेची संधी मिळाल्यास त्याचं सोनं करून दाखवू,असे मुंडे यांनी म्हंटले होते. आता त्यांचे नाव उमेदवारी यादीत नसल्यामुळे त्या नक्की काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment