हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई महापालिकेच्या महापौरपदावरून महायुतीमध्ये पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडल्याचे दिसत आहे. भाजप नेते मंगलप्रभात लोढा यांनी ‘पड़ोस का बच्चा कितना भी सुंदर हो, गोद में हम अपने घर के बच्चे को उठाते हैं’ असे सूचक विधान करत भाजपचाच महापौर होणार असल्याचे संकेत दिले आहेत. यानंतर एकनाथ शिंदे यांची शिवसेना आक्रमक झाली आहे. शिंदेंचे खास शिलेदार आणि मंत्री शंभूराज देसाई यांनी जुन्या इतिहासाचा दाखला देत मंगलप्रभात लोढा यांना प्रत्त्युत्तरं दिले आहे. एकनाथ शिंदेंच्या उठावामुळेच भाजप सत्तेत आली हे लोढा यांनी लक्षात ठेवाव असं शंभूराज देसाई यांनी म्हंटल.
काय म्हणाले शंभूराज देसाई ?
प्रसारमाध्यमांशी बोलताना शंभूराज देसाई म्हणाले, २०१४ नंतर जी राजकीय स्थित्यंतरे महाराष्ट्रात घडली, थोडं मंगल परभात लोळाली त्याच्याकडे सुद्धा पाठीमागे वळून बघितलं पाहिजे. कारण २०१४ ते २०१९, जेव्हा भाजपचं आणि शिवसेनेचं सरकार होतं, तेव्हा काय वस्तुस्थिती राज्यामध्ये होती हे आपण पाहिलं. पण २०१९ नंतर जेव्हा महाविकास आघाडी झाली आणि ते झाल्यानंतर भाजप विरोधामध्ये बसली आणि उद्धव ठाकरे साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेसनं काँग्रेस बरोबर महाविकास आघाडी करून सरकार केलं. त्यावेळची काय होती परिस्थिती, तर पूर्ण ताकदवान ही राष्ट्रवादी काँग्रेस असेल, काँग्रेस असेल, हे करण्याचा प्रयत्न त्या महाविकास आघाडी सरकारमधून झाला.
नंतरच्या काळात जेव्हा आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी कडक भूमिका घेतली. २०२२ ला आणि आम्ही ५० आमदारांनी आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली उठाव केला. तिथून खऱ्या अर्थानं स्थित्यंतर महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीमध्ये झालं आणि सत्तेच्या बाहेर असणारी भाजप ही आदरणीय शिंदे साहेबांच्या या निर्णयामुळे ही पुन्हा सत्तेमध्ये आली आणि त्याचा परिणाम झाला की, आदरणीय शिंदे साहेबांनी अडीच वर्षे मुख्यमंत्री म्हणून जे राज्यामध्ये काम केलं ते महायुती म्हणूनच केलं. आम्ही मंत्रिमंडळामध्ये आदरणीय शिंदे साहेबांचे होतो. कोणताही निर्णय आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब हे तत्कालीन उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांशी विचारविनिमय करूनच घेत होते. आणि महायुती भक्कम करायचं काम आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी केलं आणि आपण बघितलं असेल की शिंदे साहेबांची गती, शिंदे साहेबांची वेगवान कामाची पद्धत, जागेवर निर्णय घ्यायची क्षमता, त्यामुळे महायुतीला २०२४ ला प्रचंड यश मिळालं असं शंभूराज देसाई यांनी म्हंटल.




