मुख्यमंत्रीजी सामान्यांनी कसे जगायचे सांगा ? भाजपचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने लॉकडाऊन ची घोषणा केली असून त्यादृष्टीने सरकारने काही गरीब वर्गांना आर्थिक पॅकेज जाहीर केले होते. परंतु हे पॅकेज त्या वर्गांपर्यंत पोचली नसल्याचा आरोप भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला आहे. आणि त्यावरूनच त्यांनी पुन्हा एकदा सरकार वर टीकेची झोड उठवली आहे.

केशव उपाध्ये यांनी ट्विट करत म्हंटल की, मुख्यमंत्री जी सांगा गरिबांनी जगायचं कस? असा सवाल करत 14 एप्रिलपासून संचारबंदीच्या नावाखाली लॉकडाऊन लागू केला त्यावेळी जे पॅकेज जाहीर केले त्याचे काय झाले सांगा. आता आणखी पंधरा दिवस लॉकडाऊन वाढवला आहे, सामान्यांनी कसे जगायचे सांगा

लाख फेरीवाल्यांना प्रत्येकी 1500 रुपये तर 12 लाख रिक्षाचालकांना प्रत्येकी 1500 रु देण्याचे जाहीर केले होते. कितीजणांना प्रत्यक्ष मदत दिली सांगा. अपयश झाकायला कांगावा व अकांडतांडव पण जनतेला मदत करायचे म्हणल्यावर हे सरकार कोडगे बनते. दुर्बल घटकांना मदत करायची सरकारची इच्छाच नाही असा आरोप देखील केशव उपाध्ये यांनी केला.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

You might also like