जनतेला वाऱ्यावर सोडलंय, निदान मंत्र्याला तरी शोधा ; भाजपची बोचरी टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापलं असून महाविकास आघाडी सरकारच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यातच या प्रकरणी मंत्री संजय राठोड यांचं नाव आल्यापासून ते गायब आहेत. दरम्यान महाराष्ट्र भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आज याच मुद्द्यावरून सरकारवर बोचऱ्या शब्दांत टीका केली आहे.

केशव उपाध्ये यांनी या संदर्भात एक ट्वीट केलं आहे. ‘महाराष्ट्रात सर्वसामान्य सुरक्षित नाहीत हे तर दिसतच होतं पण आता मंत्री महोदय १० दिवस गायब आहेत आणि कुणालाच सापडत नाही यापेक्षा राज्याची वाईट अवस्था काय असू शकते?,’ असा प्रश्न त्यांनी केला आहे.

तसेच रोज तुमच्या सोबत बसणारा सहकारी मंत्री ११ दिवस गायब आहे त्याला तरी शोधा, महिलांवर अत्याचार वाढलेत, गुंड मिरवणूक काढतो रस्त्यावर हे सगळ महाराष्ट्र पाहतोय पण थेट मंत्रीच ११ दिवस गायब. ना आता ना पता. जनतेला वाऱ्यावर सोडल हे दिसतय पण किमान सहकारी मंत्री त्याचा तरी शोध घ्या असा टोला केशव उपाध्ये यांनी लगावला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like