लाडक्या आर्यनला बेल मिळाला, मलिक आणि राऊत जनतेच्या प्रश्नावर पत्रकार परिषद घेणार का?? भाजपचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आर्यन खान ड्रग प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं असून सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये आरोप- प्रत्यारोप सुरू होते. आता आर्यन खान ला कोर्टाकडून जामीन मिळाल्यानंतर भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विट करत राज्य सरकार वर टीका केली आहे. तसेच नवाब मलिक आणि संजय राऊत जनतेच्या प्रश्नांवर कधी तरी पत्रकार परिषद घेणार का? असे म्हणत केशव उपाध्ये यांनी टोला लगावला.

राष्ट्रवादी, शिवसेना नेत्यांच्या लाडक्या आर्यनला एकदाचा बेल मिळाला. त्यामुळे त्यांचा जीव भांड्यात पडला. आता तरी त्या अतीवृष्टीने उध्वस्त झालेल्या शेतकऱ्याकडे लक्ष द्यायला वेळ मिळेल का? आरोग्य विभागाच्या परिक्षांच्या गोंधळांनी हताश विद्यार्थ्याकडे पहाणार का? असा सवाल केशव उपाध्ये यांनी केला आहे.

वाढत्या अत्याचाराचा घटनांनी महिलांना असुरक्षित वाटते त्यांना दिलासा मिळणार का? नवाब मलिक आणि संजय राऊत जनतेच्या प्रश्नांवर कधी तरी पत्रकार परिषद घेणार का? असे म्हणत केशव उपाध्ये यांनी टोला लगावला.