संजय राऊत, नेमकी भुताटकी कुठे झाली आहे? भाजपचा सवाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विधान परिषदेच्या १२ सदस्यांच्या नियुक्ती वरून सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष भाजप यांच्यात खडाजंगी होत असतानाच आता हा 12 आमदारांच्या नियुक्तीचा प्रस्ताव अजूनही विचाराधीन असल्याचे उत्तर माहितीच्या अधिकारात प्राप्त झाल्याचे भाजपने म्हटले आहे. यावर सरकारने आता खुलासा करावा असे आवाहन भाजपने केले आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी यावरून शिवसेना खासदार संजय राऊतांवर जोरदार निशाणा साधलाय.

‘त्या १२ आमदारांचा प्रस्ताव विचाराधीन मुख्यमंत्री कार्यालयाचे माहिती कायदा अतंर्गत उत्तर. प्रश्न होता- प्रस्ताव कधी पाठवला? कोणती नावे पाठविली? काही उत्तर आले का? हा प्रस्तावच विचाराधीन असल्याचे सांगितले आहे. मात्र आता संजय राऊत नेमकी भुताटकी कुठे झाली आहे?’ असा उपरोधिक सवाल उपाध्ये यांनी विचारलाय.

कारण हा प्रस्तावच अजून विचाराधीन आहे. सोमेश कोलगे यांनी ही माहिती माहितीच्या अधिकाराअंतर्गत विचारली होती. आता खुलासा व्हायला हवा. पूर्वी ठरलेली नाव बदलण्याचा प्रस्ताव आहे का? तिन्ही पक्षांचा कोटा बदलतोय का? मुख्यमंत्री मंत्रालयातच जात नसल्याने विचार पूर्ण झाला नाही का?’, असे प्रश्नही उपाध्ये यांनी विचारले आहेत.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

Leave a Comment