Tuesday, February 7, 2023

शिवसेनेसोबत पुन्हा युती करणार का? अमित शहा म्हणतात….

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेसोबत पुन्हा युती करणार का? असा प्रश्न केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना आज विचारण्यात आला त्यावर अमित शहांनी महत्वपूर्ण विधान केले असून “मी काही ज्योतिषी नाही, शिवसेना असो की अकाली दल आम्ही त्यांना बाहेरचा रस्ता दाखवलेला नाही. एनडीएमधून हे दोन्ही पक्ष स्वतःच बाहेर पडले आहेत. त्याला आम्ही काय करु शकतो” असं म्हटलं आहे.

शिवसेना, अकाली दलानं भाजपची साथ सोडली. शिवसेना गेल्या वर्षी भाजपची साथ सोडली. तर अकाली दलानं कृषी विधेयकांच्या मुद्द्यावरून एनडीएला सोडचिठ्ठी दिली. शिवसेना आणि अकाली दल भाजपचे जुने मित्र पक्ष होते. त्यांनी भाजपशी फारकत घेतल्यानं भाजपप्रणित एनडीएला धक्का बसला. त्यावर अमित शहांनी ‘नेटवर्क१८’ ला दिलेल्या मुलाखतीत प्रतिक्रिया दिली. ‘एनडीएमध्ये आजही ३० पेक्षा जास्त पक्ष आहेत. शिवसेना आणि अकाली दलानं भाजपची साथ सोडली. आम्ही त्यांची साथ सोडली नाही,’ असं शहा म्हणाले.

- Advertisement -

सध्याच्या घडीला मंदिरं उघडण्याचा मुद्दा असो किंवा इतर मुद्दे भाजपाने शिवसेनेच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. तर शिवसेनाही भाजपाविरोधात खुलेपणाने बोलते आहे. सामनातले अग्रलेख, सुशांत सिंह प्रकरण, कंगनाची वक्तव्यं या सगळ्या विषयांमध्ये भाजपा आणि शिवसेना यांच्या आरोपांच्या फैरी झडलेल्या पाहण्यास मिळाला. दुसरीकडे कृषि विधेयकांचा मुद्दा पुढे करुन अकाली दलानेही भाजपाची साथ सोडली आहे.

या दोन्ही पक्षांबाबत देशाचे गृहमंत्री अमित शाह यांना प्रश्न विचारला असता या दोन्ही पक्षांनी एनडीएची साथ सोडली आहे आम्ही त्यांना बाहेरचा रस्ता दाखवलेला नाही. त्यावर मी काय करु शकतो? असं उत्तर दिलं आहे. नेटवर्क १८ ला दिलेल्या मुलाखतीत अमित शाह यांनी हे वक्तव्य केलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’