महाविकास आघाडीचे सरकार राक्षसी प्रवृत्तीचे; गोपीचंद पडळकरांचा हल्लाबोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलगीकरण करण्यात यावे या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून एसटीचे कर्मचारी संपावर आहेत. याच पार्श्वभूमीवर एसटी कर्मचाऱ्यांनी आझाद मैदानात आंदोलन पुकारले आहे. यावरून भाजप नेते तथा आमदार गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे. आंदोलकांना साधे पिण्यासाठी पाणीही दिले जात नाही. हे महाविकास आघाडीचे सरकार हे राक्षशी प्रवृत्तीचे आहे, अशी टीका पडळकरांनी केली आहे.

मुंबईत राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून आंदोलन केले जात आहे. या आंदोलनात भाजप आमदार गोपीचंद पडळकर, विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर, सदाभाऊ खोत यांनी उपस्थिती लावली आहे. यावेळी पडळकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, विविध मागण्यांसाठी आझाद मैदानावर एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून आंदोलन सुरू आहे. आंदोलकांना महापालिका आणि सरकारकडून पिण्यासाठी पाणी देखील देण्यात आले नाही. सरकार आणि मुंबई महापालिका भिकारी आहेत. सरकारची ही राक्षसी वृत्ती आहे.

यावेळी पडळकर यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावरही निशाणा साधला. परब माध्यमांसमोर छान बोलतात, मात्र जेव्हा कर्मचाऱ्यांचे शिष्टमंडळ त्यांच्याकडे चर्चा करण्यासाठी जाते तेव्हा ते त्यांना बोलता देखील येत नाहीत. परब हे निर्णयाची कॉपी घेऊन आंदोलनस्थळी आले तर आम्ही त्यांचे स्वागत करू, असे पडळकर यावेळी म्हणाले.

Leave a Comment