चपटा पायाच्या ठाकरे सरकारने शेतकऱ्यांना काळी दिवाळी करण्यास प्रवृत्त केलेय; राणेंची घणाघाती टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भाजप नेते तथा आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारवर निशाणा साधला. “नियमित कर्ज भरणाऱ्या कोकणातल्या शेतकऱ्यांना 50 हजार देणार, असे वचन मुख्यमंत्री ठाकरे यांच्या सरकारने दिले होते. त्यामुळे क्या हुआ तेरा वादा? असे आता त्यांना विचारावसं वाटत आहे. चपटा पायाच्या ठाकरे सरकारने शेतकऱ्यांना काळी दिवाळी करण्यासाठी प्रवृत्त केले आहे, अशी टीका राणेंनी केली आहे.

आमदार नितेश राणे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, मराठवाडा, विदर्भ किंवा कोकणातल्या शेतकऱ्यांना दिवाळी साजरी करायची कशी? असा प्रश्न पडला आहे. या सत्तेवर असलेल्या चपटा पायाच्या ठाकरे सरकारने शेतकऱ्यांना काळी दिवाळी करण्यासाठी प्रवृत्त केले आहे. ड्रग्स बद्दल बोलायचं, एनसीबीबद्दल बोलायचं पण शेतकऱ्यांबद्दल बोलायचं नाही.

सध्या या ठाकरे सरकारचे दिवसभर फक्त वसुली करायची हा एककलमी कार्यक्रम सुरू आहे. अशा या ठाकरे सरकारचा मी निषेध करतो. आजी जी काही शेतकऱ्यांच्या स्थिती झाली आहे त्याला उद्धव ठाकरे आणि हे सरकारच जबाबदार आहे. या ठाकरे सरकारचे नाव बदलून बेईमानी सरकार नाव ठेवायला हवे, अशीही टीका राणे यांनी यावेळी केली.

मलिक हे पाकिस्तानचे एजंट – नितेश राणे

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक हे पाकिस्तानचे एजंट आहेत. पाकिस्तानचे जे ड्रग्ज माफिया आहेत. नवाब मलिक त्यांचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर आहेत. जावयाला अटक केली म्हणून ते एनसीबीवर टीका करत आहेत. काम करणाऱ्यांचे मनोबल खच्चीकरण होत आहे हे त्यांना कळत नाही, अशी टीका नितेश राणे यांनी केली.

Leave a Comment