1993 च्या दंगलीवेळी बाळासाहेबांमुळे हिंदू जिवंत, आता त्यांचे वारसदार काही बोलणार नाहीत का?; चंद्रकांतदादांचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । त्रिपुरामध्ये मस्जिद पाडल्याच्या कथित घटनेचे पडसाद अमरावतीमध्ये उमटले. यावरून भाजपचे नेते तथा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. “1993 च्या दंगलीत बाळासाहेबांचा पुढाकार नसता तर मुंबईत हिंदू जिवंत नसता. आता हिंदुहृदयसम्राटांचे वारसदार काही बोलणार नाहीत का, असा सवाल पाटील यांनी केला आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, महाराष्ट्रात तसेच देशात काहीही झाले की यामागे भाजपचाच हात असल्याचे बोलले जाते. अमरावतीमध्ये जी तोडफोडीची घटना घडली यामागेही भाजपचाच हात असल्याचे अप्रत्यक्षपणे बोलले जात आहे. या तोडफोडीत कोणाचा हात होता, हे ही शिवसेना खासदार राऊत यांनी एकदाचे सांगून टाकावे.

1993 च्या दंगलीबाबत सांगायचे झाले तर त्यावेळी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब नसते. आणि त्यांनी हिंदूंसाठी दंगलीत पुढाकार घेतला नसता, तर मुंबईत हिंदू जिवंत राहिला नसता, पण आता पण आता हिंदुहृदयसम्राटांचे वारसदार काही बोलणार नाहीत का? ते का गप्प आहेत. त्यांनी बोलायला हवे, असे पाटील यांनी यावेळी सांगितले.