उद्धवजींचे वर्तन पहले सरकार फिर मंदिर असं झालंय! रावसाहेब दानवेंचा टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद । पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ५ ऑगस्ट रोजी अयोध्येतील राम मंदिराचे भूमिपूजन पार पडणार आहे. दरम्यान अयोध्या राम मंदिर भुमिपूजनासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निमंत्रण न पाठवण्यावरून वाद सुरू झालाय. शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांनी मंदिर कमिटीला पत्र देखील लिहिले. अशा वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या भूमिपूजन सोहळ्यासाठी अयोध्येला जाणार का? याकडे साऱ्यांचं लक्ष लागले आहे. त्यावर आता भाजप नेते तथा केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेला चिमटा काढलाय.

निमंत्रण आले नाही तरी राम भक्त म्हणून उद्धव ठाकरे अयोध्या जाणार का ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलायं. हवं तर सरकारमधील सहकाऱ्यांची परवानगी घेऊन अयोध्येत जावं. भगवान रामांसाठी मानपान कसला आलाय. पहले मंदिर फिर सरकार म्हणणारे उद्धवजींचे आता पहले सरकार फिर मंदिर असं वर्तन असल्याचे दानवे म्हणाले.

यावेळी दूध दर वाढ आंदोलनावर रावसाहेब दानवे यांना विचारले असता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्वच पातळीवर नापास झाल्याचा दावा त्यांनी केला. दूध प्रश्न मिटवण्यात राज्याला अपयश आलय. भाजपच्या आंदोलनामुळे आत्ता राज्य सरकार बैठका घेतंय. राज्यानं वेळीच लक्ष द्यायला पाहीजे होते असे दानवे म्हणाले. राजू शेट्टी आत्ताच आंदोलन का करत आहेत. राजू शेट्टींना आमदारकीसाठी पवारांकडे जावं लागत असल्याची टीकाही दानवेंनी केली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment