Sunday, February 5, 2023

मुख्यमंत्र्यांना अखेर घराबाहेर पडण्याचे शहाणपण सुचले ; आशिष शेलारांची खोचक टीका

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचें अतोनात नुकसान झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. हे शेतकऱ्यांचं सरकार आहे, तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. दरम्यान भाजप नेते आशिष शेलार यांनी मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.ते सोमवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी राज्य सरकारवर जोरदार टीका केली.

आतापर्यंत बॉलीवूडला वाचवण्याचं काम करणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अखेर घराबाहेर पडण्याचे शहाणपण सुचल्याची खोचक टिप्पणी भाजप नेते आशिष शेलार यांनी केली. मुख्यमंत्री बांधावर गेल्यामुळे शेतकऱ्यांना काहीतरी फायद होईल. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा सोलापूर दौरा म्हणजे ‘देर आये, दुरुस्त आये’ अशाप्रकारचा असल्याचे शेलार यांनी सांगितले.

- Advertisement -

यावेळी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. हे सरकार केवळ येरागबाळ्याचे नव्हे तर बदमाशांचेही आहे, असे शेलार यांनी म्हटले. विश्वासघाताने तयार झालेले हे सरकार आत्मविश्वास विरहीत आहे. त्यांच्याबद्दल लोकांच्या मनात आत्मसन्मानाची भावना असणे सोईचे नाही. तर शेतकऱ्यांना राज्य सरकारने मदत द्यावी की केंद्राने हा मुद्दा महत्त्वाचा नाही. कुठूनही मदत मिळो, पण शेतकऱ्यांना कर्ज मिळणे अपेक्षित असल्याचे शेलार यांनी सांगितले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’