बाळासाहेब थोरातांनी बाबर खानदानावर असलेली काँग्रेसची वादातीत निष्ठा सिद्ध केली ; भाजप नेत्याची जहरी टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | औरंगाबाद शहराचा नामांतराच्या मुद्द्यावरून राज्यातील महाविकास आघाडी मध्येच ठिणगी पडली आहे. औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याला काँग्रेसचा प्रचंड विरोध आहे. त्यामुळे शिवसेनेची चांगलीच कोंडी झाली आहे. औरंगाबाद शहराच्या नामांतरावरुन राजकीय वातावरण तापलं असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शासकीय कार्यालयाच्या (CMO) अधिकृत ट्विटर अकाउंटवर औरंगाबाद शहराचा संभाजीनगर असा उल्लेख करण्यात आला आहे. याच मुद्द्यावरुन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी फेसबुक पोस्ट करत पुन्हा एकदा औरंगाबादच्या नामांतराला आपला तीव्र विरोध आहे असे स्पष्ट केले आहे.

औरंगाबादच्या नामकरणाला कडाडून विरोध करून काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी बाबर खानदानावर असलेली काँग्रेसची वादातीत निष्ठा सिद्ध केली आहे. मालकीण इटालियन असल्याचे परिणाम दुसरं काय?, असं ट्विट भातखळकर यांनी केलं आहे.

काय म्हणाले होते बाळासाहेब थोरात –

महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार हे किमान समान कार्यक्रमावर चालते. भारतीय राज्यघटनेची मूलतत्त्वे हा किमान समान कार्यक्रमाचा गाभा आहे. आम्ही पुन्हा ठणकावून सांगतो, सामाजिक सलोखा टिकून राहावा यासाठी कोणत्याही शहराच्या नामांतरणाला आमचा ठाम विरोध आहे”, अशी भूमिका थोरात यांनी मांडली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment