शिवसेनेनं मुख्यमंत्रीपदासाठी आपला पक्षच संपवला; चंद्रकांत पाटलांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर निशाणा साधला आहे. शिवसेनेनं मुख्यमंत्रीपदासाठी आपला पक्षच संपवला अशी टीका त्यांनी केली. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत विजयी झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या विजयी उमेदवारांच्या सत्कारप्रसंगी पेठनाका येथे ते बोलत होते

चंद्रकांत पाटील म्हणाले, शिवसेनेने मात्र मुख्यमंत्रीपदासाठी आपला पक्षच संपविला आहे. हे अजूनही त्यांच्या लक्षात येईना, गावोगावी राष्ट्रवादीने शिवसेनेचा पाडाव सुरु केला आहे. तरीही ही गोष्ट शिवसेनेच्या लक्षात येत नाहीये. असो. हा त्यांचा प्रश्न आहे असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं.

ते पुढे म्हणाले, भाजप राज्यात एक क्रमांकाचा पक्ष आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक भाजप कमळ चिन्हावरच लढवेल. स्थानिक पातळीवर जिल्हाध्यक्षांनी निर्णय घ्यायचा आहे. भाजपचे चिन्ह घराघरात पोहोचविण्यासाठी ताकदीने कामाला लागा. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

You might also like