“नागपुरात अधिवेशन घ्यायचं असेल तर त्यासाठी मातोश्रीच्या बाहेर पडावं लागेल”- चंद्रकांत पाटील

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

लातूर । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागपुरात होणारे हिवाळी अधिवेशन मुंबईत घेण्याचा विचार राज्य सरकारकडून सुरु आहे. याच मुद्द्यावरुन आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये कलगीतुरा रंगल्याचं दिसत आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अधिवेशनाच्या मुद्द्यावरुन राज्य सरकारला चांगलंच घेरलं आहे.

येत्या 7 तारखेला नागपुरात हिवाळी अधिवेशन होणार होतं. पण सरकार नागपूरला अधिवेशन घेणार नाही हे मी आधीच सांगितलं होतं. नागपुरात अधिवेशन घ्यायचं असेल तर त्यासाठी आधी मातोश्रीबाहेर पडावं लागेल. त्यामुळेच हे अधिवेशन मुंबईत घेतलं जात आहे, असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंदक्रांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. ते लातूर येथे बोलत होते.

याशिवाय मी या आधीच सांगितलं होतं. सरकार हिवाळी अधिवेशन नागपुरात घेणार नाही. त्याविषयी कामकाज सल्ल्लागार समितीची बैठक सुरु आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप नेते आशिष शेलार, भाजप नेते गिरीश महाजन आदी भाजप नेते उपस्थित आहेत. यावेळचे हिवाळी अधिवेशन मुंबई घेण्याचा त्यांचा विचार आहे. त्यामुळे मुंबईत होणारे अधिवेशन कमीत कमी 15 दिवसांचे तरी असावे अशी आमची मागणी आहे, असे ते म्हणाले. तसेच नागपुरातील अधिवेशन हा एक करार आहे. एक कायदा आहे. त्यामुळे डिसेंबरमधील अधिवेशन नागपुरात होणार नसेल तर मार्च महिन्यातील अर्थसंकल्पीय अधिवेशन तरी नागपुरात घ्यावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in

Leave a Comment