सावित्रीच्या लेकींसाठी सरकार महाराष्ट्र बंद कधी करणार ?; चित्रा वाघ आक्रमक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाराष्ट्राला हादरवून सोडणारी घटना पुण्यात घडली. एका अल्पवयीन मुलीची कोयत्याने वार करुन हत्या केल्याचा प्रकार झाल्याने सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. या हत्येनंतर आता राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या असून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी यावरुन ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. ” “राज्य सरकार सावित्रीच्या लेकींसाठी महाराष्ट्र बंद कधी करणार? असा सवाल वाघ यांनी ट्विटच्या माध्यमातून विचारला आहे.

चित्रा वाघ यांनी ट्विटच्या माध्यमातून राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. आपल्या ट्विटमध्ये त्यानी म्हंटले आहे की, “अतिशय भयानक… पुण्यात काय चाललंय ? कोयत्याने वार करून खून करण्यात आला. टाईप करतानाही अंगावर काटा येत आहे. त्या मुलीने काय भोगलं असेल..? राज्यातील कायदा सुव्यवस्था वाऱ्यावर आहे. पोलिसांचे कायदे फक्त कागदावर आहेत. महाराष्ट्रातल्या आपल्या या सावित्रीच्या लेकी रोज बळी पडत आहेत. यांच्यासाठी सरकार महाराष्ट्र बंद कधी करतंय ?”

पुण्यातील बिबवेवाडी येथे एका अल्पवयीन मुलीची क्रूरपणे हत्या केल्याची घटना घडली आहे. नात्यातील व्यक्तीनेच या मुलीवर कोयत्याने वार करुन तिचा खून केलाय. विशेष म्हणजे आजूबाजूला छोटी मुलं आणि व्यायाम करणारे नागरिक असताना देखील आरोपीने हे धाडस केलं आहे. समोर मुलीची हत्या होत असताना छोटी मुलं आजूबाजूला खेळत होती.

Leave a Comment