हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबईत विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी पार पडलेल्या अधिवेशनात अनेक मुद्यांवरून विरोधकांकडून सत्ताधाऱ्याना धारेवर धरले जात आहे. दरम्यान राज्यात 25 हजार महिला गायब झाल्याची माहितीगृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी अधिवेशनात दिली. यावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. महिला गायब होण्याची माहिती देताना सरकारची जीभ का जड झाली नाही. 25 हजार महिला गायब कशा काय होऊ शकतात? राज्यात तस्करीचे रॅकेट सक्रीय आहे का? माता भगिनींचं रक्षण करू न शकणारे सरकार आणि कसाई यांच्यात फरक काय?, असा सवाल वाघ यांनी केला आहे.
मुंबईतील विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात दुसऱ्या दिवशी अनेक मुद्यांवरून विरोधक व सत्ताधारी यांच्यात खडाजंगी झाली. यावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट करीत निशाणा साधला. वाघ यांनी ट्विटमध्ये म्हंटले की, नेमकं या राज्यात चाललयं काय? कधी पोलिस आयुक्त गायब होतात तर कधी गृहमंत्री गायब होतात, कधी मुख्यमंत्री गायब होतात. आणि आता तर राज्यातील 63 हजार महिला गायब झाल्या आहेत. ज्यातील काही महिला सापडल्या आहेत. तर 25 हजार महिला अद्यापही गायबच आहेत.
नेमकं राज्यात चाललयं काय ??
कधी पोलिस आयुक्त गायब होतात ??
कधी गृहमंत्री गायब होतात ??
कधी मुख्यमंत्री गायब होतात ??
आणि
आतातर राज्यातल्या ६३ हजार महिला गायब झाल्या ज्यातल्या काही मिळाल्या २५ हजार अद्याप हि गायब आहेत @CMOMaharashtra @maharashtra_hmo @Dev_Fadnavis @ChDadaPatil pic.twitter.com/A7y847cShK— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) December 23, 2021
राज्यातील महिला गायब होत आहेत हि गोष्ट चीड आणणारी आहे. आता तर ६३ हजार महिला गायब झाल्या. सरकारच्या नाकाखाली महिला गायब होत आहेत. हि लाजिरवाणी गोष्ट आहे. पोलीस यंत्रणा नेमकी करत आहे का? हि यंत्रणा सेलिब्रिटींच्या दावणीला बांधली असल्यामुळे त्याच्याकडे या गायब झालेल्या महिलांना शोधून काढण्यासाठी वेळ नाही का? असा सवाल चित्रा वाघ यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना विचारला आहे.