राहुल गांधींना ड्रग्जचं व्यसन; भाजप नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप आणि काँग्रेस मधील वाद आता आणखी चिघळला आहे. काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अशिक्षित असा उल्लेख केल्यामुळे आधीच वाद निर्माण झालेला असताना आता भाजपा नलीन कुमार कटील यांनी राहुल गांधी यांना ड्रग च व्यसन असल्याचे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यामुळे भाजप आणि काँग्रेसमधील वाद अजून वाढण्याची शक्यता आहे.

“राहुल गांधी कोण आहेत? मी हे सांगत नाही आहे. राहुल गांधींना ड्रग्जचं व्यसन असून ते ड्रग्ज तस्करदेखील आहेत. हे मीडियात आलं होतं. तुम्ही साधा पक्षही चालवू शकत नाही,” असं नलीन कुमार कटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, यापूर्वी कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डिके शिवकुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अंगुठीछाप म्हणत नव्या वादाला तोंड फोडले होते. त्यानंतर त्यांच्यावर सर्वत्र टीका झाल्यानंतर त्यांनी ते ट्विट डिलीट केलं.

Leave a Comment