आपत्तीकाळातील मदतीच्या घोषणा नुसत्या हवेतीलच; फडणवीसांचा मुख्यमंत्री ठाकरेंवर हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मराठवाडा येथे अतिवृष्टीचे संकट आले आहे. नुकसानीची पाहणी करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांप्रमाणे भाजप नेतेही जाणार आहेत. तत्पूर्वी आज भाजपचे नेते तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नुकसानीची मदत, घोषणांवरून राज्य सरकार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. “यापूर्वीही राज्यात ज्या ज्या वेळी आपत्ती आली तेव्हा राज्य सरकारकडून ज्या घोषणा दिल्या गेल्या त्या हवेत विरल्या आहेत. कुठल्याच घोषणेची पूर्तता झाली नसल्याचा आरोप करीत फडणवीसांनी हल्लाबोल केला.

भाजप नेते तथा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अतिवृष्टी, महापुरात घोषणांवरून राज्य सरकारवर निशाणा साधला. यावेळी ते म्हणाले की, अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात शेतीचे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत त्यांची भेट घेऊन त्यांना दिलासा दिल्यास देण्याची गरज आहे. त्यांची हाता-तोंडाशी आलेले पीक वाहून गेल्यामुले त्यांना मदतीची खूप गरज आहे. मात्र, राज्य सरकारकडून यापूर्वीही अतिवृष्टी व महापुरामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यात आलेली नाही. राज्य सरकारने मदतीच्या केलेल्या घोषणा हवेत विरल्या आहेत. त्या घोषणा कागदावर राहिलेल्या आहेत.

प्रवीण दरेकरांसोबत उद्यापासून मराठवाडा दौऱ्यावर

मराठवाडा व विदर्भात जे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले आहे. त्या ठिकाणी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासोबत उद्यापासून पाहणी करणार आहे. त्या ठिकाणी जाऊन तेथील शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेणार आहोत. तसेच त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राज्य सरकारकडे नुकसानीच्या भरपाईबाबत मागणी करणार असल्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

You might also like