“पवारसाहेब कधीही चुकीचा निर्णय घेणार नाहीत”; फडणवीसांच्या विधानाने अनेकांच्या भुवया उंचावल्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । कांजूरमार्गवरील मेट्रो प्रकल्पाचं काम थांबवण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिल्यानंतर भाजप आणि शिवसेना असा सामना रंगलेला पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी साधलेल्या संवादात केंद्र सरकार आणि राज्यातील भाजप नेत्यांना चर्चेचं आवाहन केलं आहे. त्यानंतर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना प्रतिप्रश्न केले आहेत. तसेच या विषयासंदर्भात खासदार शरद पवार हे जर पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणार असतील, तर स्वागतच आहे. कारण, पवारसाहेब प्रॅक्टीकल आहेत, ते कधीही चुकीचा निर्णय घेणार नाहीत, असे म्हणत फडणवीसांनी मेट्रो प्रकल्पाचा चेंडू शरद पवारांच्या कोर्टात टाकला आहे.

शरद पवार प्रॅक्टीकल
या मेट्रो प्रकल्पात आम्ही भावनिकदृष्ट्या जुडलेलो आहोत, मेट्रो होऊ नये असं कोणाचंच मत नाही. मी स्वत: मेहनत करुन 80 टक्के टनलिंगचं काम त्या काळात पूर्ण केलंय. त्यामुळेच पवारसाहेब जर मोदींशी बोलून यासंदर्भात चर्चा करणार असतील, तर त्यांचं स्वागतच आहे. उद्धव ठाकरेंनीही मोदींशी चर्चा करावी. हे पहा, शरद पवार आणि आमचे कितीही वैचारिक मतभेद असले तरी, पवारसाहेब जेव्हा तो अहवाल वाचतील, तेव्हा ते प्रॅक्टीकल निर्णय घेतील, पवारसाहेब कधीही चुकीचा निर्णय करणार नाहीत, असा आशावाद फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

प्रकल्पात केंद्राचाही वाटा
महाविकास आघाडी सरकारे उच्चाधिकार समिती स्थापन केलीय, त्या समितीच्या अहवालानुसार या मेट्रोचं 80 टक्के काम झालंय. आरे शेडमध्ये जे मेट्रो स्टेशन कारायचंय, त्याचही 100 कोटींपेक्षा जास्त काम झालंय. विशेष म्हणजे कांजूरमार्गच्या जागेचा उल्लेख करताना, आत्ता खर्चाचा बोजा पडेलच, शिवाय 2021 मध्ये होणारी मेट्रो 2024 सालापर्यंत मिळणार नाही, असे फडणवीस यांनी सांगितलं. तसेच, हा केवळ राज्य सरकारचा प्रकल्प नसून केंद्राचाही 50 टक्के हातभार या प्रकल्पासाठी आहे. त्यामुळे, हा विषय प्रतिष्ठेचा करण्यात काहीच अर्थ नाही. कारण, आरेत बांधकाम केल्याशिवाय कांजूरमार्गला मेट्रो करताच येणार नाही, हे सत्य आपण का लपवतो, असा सवालही फडणवीस यांनी विचारला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment