सातारा जिल्हा बँक निवडणुक : देवेंद्र फडणवीस, चंद्रकांदादांच्या आदेशानेच काम – डॉ. अतुल भोसले

मतदान केंद्राबाहेर भोसलेंची बाळासाहेब पाटील गटाच्या कार्यकर्त्यांशी चर्चा

कराड प्रतिनिधी। सकलेन मुलाणी

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज रविवारी मतदानास सुरुवात झाली आहे. सकाळी भाजप नेते डॉ. अतुल भोसले व त्यांचे वडील डॉ. सुरेश भोसले यांनी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी मतदान केंद्राबाहेर सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली. “पक्ष पातळीवर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून निर्णय झालेला आहे. त्यामुळे निवडणुकीचा निकाल हा आपल्याला दिसेल. आम्ही केलेल्या सहकार्यामधून काय निष्पन्न होईल हे लवकरच कळेल, असे डॉ. अतुल भोसले यांनी म्हंटले.

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी कराड सोसायटी गटासाठी येथील शिवाजी हायस्कुल येथे आज मतदानास सुरुवात झाली. यावेळी डॉ. सुरेश भोसले व डॉ. अतुल भोसले यांनी मतदान केंद्रात येऊन मतदानाचा हक्क बजावला. सकाळपासून दहा वाजेपर्यंत 90 टक्के मतदान पार पडले.

यावेळी त्यांनी माध्यमांशीही संवाद साधला. यावेळी डॉ. अतुल भोसले म्हणाले की, “राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या या निवडणुकीत राज्याचे सहकारमंत्री उमेदवार आहेत. त्यामुळे खूप जबाबदारीने मतदान करणे गरजेचे आहे. पक्ष पातळीवर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस याच्याशी चर्चा करून निर्णय झालेला आहे. त्यामुळे निवडणुकीचा निकाल हा आपल्याला आम्ही केलेल्या सहकार्यामधून काय निष्पन्न होईल हे लवकरच दिसेल.

दरम्यान आज सकाळी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर भाजप नेते डॉ. अतुल भोसले यांचे वडील डॉ. सुरेश भोसले यांनी सहकारमंत्री तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या गटातील कार्यकर्त्यांशी चर्चा केली. यावेळी बाळासाहेब पाटील यांचे पुत्र जशराज पाटील उपस्थित होते. यावेळी त्यांच्यात चर्चाही झाली. त्यामुळे सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने भोसले व पाटील गट एकत्रित आल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये केली जात आहे.