Wednesday, February 1, 2023

ठरलं! एकनाथ खडसे शुक्रवारी दुपारी 2 वाजता राष्ट्रवादीत प्रवेश करणार

- Advertisement -

जळगाव । भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाची केवळ औपचारिकता बाकी आहे. भाजपवर नाराज असलेले एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावर अखेर शिक्कामोर्तब झाला आहे. खडसेंच्या पक्ष प्रवेशाची राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील याबाबत अधिकृत घोषणा करणार आहेत. खडसे समर्थक भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकनाथ खडसे यांच्या बंगल्यावर जमा झाले आहेत.

कार्यकर्त्यांमध्ये खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची उत्सुकता आहे. मुंबईत राष्ट्रवादीकडून खडसेंच्या प्रवेशाची अधिकृत घोषणा होणार आहे. थोड्याच वेळात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे पत्रकार परिषद घेत आहेत. (Eknath Khadse to enter NCP soon after resigne BJP) एकनाथ खडसे येत्या शुक्रवारी दुपारी दोन वाजता राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्याआधी ते भाजपचा राजीनामा देऊन सर्व पदे सोडणार आहेत.

- Advertisement -

एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाचा घटस्थापनेचा मुहूर्त चुकल्यानंतर आता त्यांनी आता नवी वेळ निश्चित केली आहे. त्यानुसार एकनाथ खडसे (Eknath Khadse) येत्या शुक्रवारी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. खडसे यांच्या गोटात त्यादृष्टीने हालचालाही सुरु झाल्या आहेत. त्यासाठी खडसे समर्थकांना गुरुवारी मुंबईत जमण्याच्या सूचना आधीचं देण्यात आल्याचे समजते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”