महाविकास आघाडी सरकारने राज्याला दहा वर्षे मागे नेऊन ठेवलं हे दुर्दैवी; गिरीश महाजनांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावरून महाविकास आघाडी सरकारवर भाजप नेत्यांकडून वारंवार टीका केली जाते. दरम्यान आज भाजप नेते गिरीश महाजन यांनी महाविकास आघाडी सरकावर हल्लाबोल केला. “महाविकास आघाडी सरकारने राज्याला दहा वर्षे मागे नेऊन ठेवलं हे दुर्दैवी. सरकारमधील मंत्र्यांच्या एवढ्या चौकशा सुरु आहेत की भ्रष्टाचाराला लिमिटच राहिलेले नाही. अनेक मंत्र्यांवर गंभीर आरोप तरीही कारवाई नाही तर या सरकारमध्ये निर्लज्जपणाचा कळस असल्याची टीका महाजन यांनी केली.

भाजप नेते गिरीश महाजन यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्य सरकावर टीकास्त्र डांगळे. ते म्हणाले की, महाविकास आघाडीचे सरकार हे तीन पक्षाचे सरकार आहे. मात्र, कोनामध्येही एकमत नाही. बदल्यांमध्ये पैसे घ्यायचे याच्या व्यतिरिक्त सरकारने काम केलेले नाही.

एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबाबत सांगायचे झाले तर आमच्या सरकारच्या काळात मोर्च्यांनीरेकॉर्ड मोडले. मात्र, आम्ही प्रत्येक मोर्चाला स्वतःहून समोर जायचो याचा मी साक्षीदार आहे. मात्र, या सरकारमध्ये कोणी कोणाची दखल घेत नाही. तुम्ही मोर्चा काढा उपोषणाला बसा किंवा मरा मात्र या सरकारला कुठलेलंही सोयरसुतक नाहीन अशी टीका महाजन यांनी केली आहे.

You might also like