सत्तेसाठी हिंदू समाजावर दहशत माजविणार असाल तर देव तुम्हाला…; किरीट सोमय्यांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात अमरावतीसह काही ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या. अमरावतीतील नागरिकांची भेट घेण्यासाठी जाणाऱ्या भाजप नेते किरीट सोमय्या यांना पोलिसांनी नोटीस बजावले आहे. यावरून सोमय्या यांनी ठाकरे सरकावर हल्लाबोल केला. “राज्यात तीन ठिकाणी हिसाचाऱ्यांच्या घटना घडल्या. त्या ठिकाणी असलेल्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सत्तेसाठी हिंदू समाजावर दहशत माजविण्याचा काम करत असेल तर देव त्यांना सुबुद्धी देवो,” अशी टीका सोमय्या यांनी केली आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या यांना अमरावतीस जाण्यावर बंदी घालत पोलिसांनी नोटीस बजावली. त्यानंतर सोमय्या यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, ठाकरे आणि पवार सरकार काहीही झाले तरे भाजपवर आरोप करण्याचे काम करत आहेत. अशात राष्ट्रवादी नेते नवाब मलिक हे म्हणत आहे.

राज्यात इतरत्र काही झाले नाही आणि तीन शहरांमध्ये हिंसाचाराची घटना घडली. काय चालले आहे काय? या सरकारला लाज कशी वाटत नाही. सत्तेसाठी आपल्या हिंदू समाजावर दहशत माजविणार असेल तर देव या सरकारला सुबुद्धी देवो, शी टीका सौम्य यांनी केली.

You might also like