अजित पवारांचे कारखान्याबाबतचे स्पष्टीकरण हे बोगस – किरीट सोमय्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जरंडेश्वरसह इतर साखर कारखान्यांवर टाकण्यात आलेल्या धाडीबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पत्रकार परिषद घेत उत्तर दिले. यावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी प्रत्युत्तर दिले असून त्यानी सवालही केला आहे. अजित पवारांनी नुसतीच पीआर एजन्सीने दिलेली यादी वाचून दाखवलेली दिसते. अजित पवार तुम दुनिया की सैर करलो. पण मूळ मुद्दा बाजूलाच राहिला आहे. पवारांनी आज जी काही कारखान्यांच्याबाबत स्पष्टीकरण दिलेले आहे ते बोगस आहे, असे सोमय्या यांनी म्हंटले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पत्रकार परिषद घेत आपल्यावर करण्यात आलेल्या आरोपांबाबत खुलासा केला. मात्र, त्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्यांनी पवारांवर निशाणा साधला आहे. सोमय्या यांनी आपल्या ट्विटमधून म्हंटले आहे की, आज अजित पवार यांनी जी काही कारखान्यां संदर्भात माहिती दिली आहे ती खोटी आणि बोगस आहे. वास्तविक अजितदादांनी त्यांच्या कंपन्या आणि त्यांच्या बहिणींच्या आर्थिक व्यवहारावरही त्यांनी चिंता व्यक्त केली होती. बिल्डरबरोबर असलेल्या त्यांच्या संबंधावर त्यांनी काहीच भाष्य केलेले नाही.

अजित पवार यांनी जरंडेश्वर मिल प्रायव्हेट लिमिटेड कंपनी हि बेनामी पद्धतीने घेतली आहे. आजसुद्धा त्या कारखान्याचे मालक ही पवारांची कंपनीचं आहे. जरंडेश्वरच्या विक्रीतून 2009 मध्ये 50 कोटी रुपये त्यांना मिळाले होते. या सर्व प्रश्नांना अजित पवारांनी त्यांनी बगल दिली आहे. गुरु कमोडिला कारखाना कसा दिला? कमोडिटीजला कारखाना चालवण्याचा गंधही नव्हता. त्यांचा संबंधही नव्हता. तरीही त्यांना कारखाना कसा विकला? असा सवाल सोमय्यांनी यावेळी केला आहे.

Leave a Comment