54 कोटी बेनामी संपत्ती कुठल्या मंत्र्याची, ठाकरे सरकार जवाब दो; किरीट सोमय्यांचा सवाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात आयकर विभागाकडून अनेक संस्था, पतसंस्थांकडून कारखान्यांना करण्यात आलेल्या कर्ज पुरवठ्याची चौकशी केली जात आहे. यावरून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. “आयकर विभागाने बुलढाणा या पतसंस्थेची चौकशी केली असून त्यात बेनामी संपत्ती सापडली आहे. हि कुठल्या मंत्र्याची बेनामी संपत्ती आहे, ठाकरे सरकार उत्तर द्या?”, असा सवाल सोमय्या यांनी केला आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज ठाकरे सरकारवर निशाणा साधला. त्यांनी ट्विट करीत ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. सोमय्या यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, “मी 8 आणि 9 नोव्हेंबर रोजी दिल्ली येथे आयकर विभाग सीबीडीटी, ईडी, सहकार मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची भेट घेणार आहे. त्यानंतर 10 नोव्हेंबर रोजी ठाकरे सरकारचे मंत्री यांच्या विरोधात मुंबई येथे तक्रार दाखल करणार आहे. पुढील काही आठवड्यांत ज्या तीन मंत्र्यांचे घोटाळे काढणार त्या पैकी हा पहिला खुलासा करीत आहे. आता थेट अँक्शन घेणार आहे.

त्याचप्रमाणे नुकतेच आयकर विभागाने एक कारवाई केली असून त्यामध्ये या विभागाला बुलढाणा सहकारी पतसंस्थाचे 1200 बेनामी अकाउंट 54 कोटी रुपये सापडले आहेत. त्याचा अधिक तपास या विभागाकडून केला जात आहे. ठाकरे सरकार जवाब दो? कुठल्या मंत्र्याची बेनामी संपत्ति!! असा सवाल यावेळी सोमय्या यांनी केला आहे.

Leave a Comment