शरद पवार सांगा दाऊद सोबत विमानात कोण बसलं होतं?; किरीट सोमय्या यांचा सवाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्याकडून महाविकास आघाडी सरकारवर टीका केली जात आहे. सोमय्या यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधला. यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केला. “ठाकरे सरकारचा बाप असलेल्या शरद पवार यांना विचारा 1993-94 मध्ये दाऊदसोबत कोण बसलं होतं? दाऊदसोबत कोण बसलं होतं हे शरद पवार विसरले का? ठाकरे आणि पवारांना लाज वाटली पाहिजे, असा सवाल सोमय्या यांनी केला आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज एका कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. यावेळी ते म्हणाले की, प्रत्येकाला हिशोब हा द्यावा लागणार आहे. समीर वानखेडे यांचा बाप काढण्याचे काम काहीजण करत आहेत. समीर तेरा बाप ज्ञानदेव नही, दाऊद है’, त्यांचा बाप नाही, ठाकरे सरकारचा बाप असलेल्या शरद पवार यांना विचारा 1993-94 मध्ये दाऊदसोबत कोण बसलं होतं? दाऊदसोबत कोण बसलं होतं हे शरद पवार विसरले का? ठाकरे आणि पवारांना लाज वाटली पाहिजे. दाऊदचा संबंध कुणाशी आहे, दाऊद कुणाचा बाप आहे हे महाराष्ट्राच्या जनतेला समजले आहे.

“सध्या ठाकरे सरकारमधील तीन मंत्र्यांकडून आपल्या जावयांना खुश करण्याचे काम केले जात आहे. राज्यात सध्या सर्वत्र भ्रष्टाचार, घोटाळे केले जात आहे. मी महाराष्ट्राला घोटाळेमुक्त करणार आहे. घोटाळेबाज ठाकरे पवार सरकारकडून महाराष्ट्रात वसुली सरकार निर्माण करण्याचे पाप केले जात आहे,” अशी टीका सोमय्या यांनी केली.

Leave a Comment