उद्धव ठाकरेंनी सत्तेपोटी भगवा सोडला, हिरवा घेतला; सोमय्यांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. उद्धव ठाकरेंनी सत्तेपोटी भगवा सोडला आणि हिरवा हातात घेतला असा आरोप त्यांनी केला. किरीट सोमय्या हे अमरावती दौऱ्यावर असून काही दिवसांपूर्वी झालेल्या अमरावती हिंसाचारावरून त्यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.

हे काँग्रेस तर हिंसाचार म्हणतेच, पण उद्धव ठाकरे साहेब, बाळासाहेब ठाकरे हे 1992-93च्या दंगलीत रस्त्यावर उतरले होते. आता हिंदू मार खाणार नाही आणि उद्धव ठाकरे त्या मुस्लिमांचे तीन ठिकाणी मोर्चे निघाले दुसऱ्या दिवशी त्याचे पडसाद उमटले तर हिंसाचारल म्हणता. हा मुस्लिमांचा अत्याचार आहे, उद्धव ठाकरे सरकारमुळे आहे. उद्धव ठाकरेंनी सत्तेपोटी भगवा सोडला, हिरवा हातात घेतला, अशी घणाघाती टीका सोमय्यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.

उद्धव ठाकरे आणि ठाकरे-पवारांचे सरकार यांचे घोटाळे बाहेर आले तरीही किरीट सोमय्यालाच थांबवतात. हिंदुंवर अत्याचार होत असतात तेव्हा देखील तिथे जाण्यास किरीट सोमय्यांवर प्रतिबंध लावले जातात. 12 नोव्हेंबरला ज्या पद्धतीने महाराष्ट्रात ठाकरे सरकारच्या समर्थनाने तीन शहरात मुस्लिमांचे मोर्चे निघाले, हिंदुंना टार्गेट करण्यात आलं. त्याच दिवशी मला यायचं होतं, पण मला प्रतिबंध घातला. मी अमरावतीकरांना वचन दिलं होतं, म्हणून आज मी अमरावतीत आलोय असे किरीट सोमय्या यांनी म्हंटल.

You might also like