संजय राऊतांच्या भन्नाट डान्सवर निलेश राणेंची सडकून टीका; म्हणाले की…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुलीच्या लग्नाच्या निमित्ताने आयोजित संगीत कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंसोबत ठेका धरत भन्नाट डान्स केला आहे. त्यांच्या या डान्सवरून भाजप नेते निलेश राणे यांनी सडकून टीका केली आहे. “दारू वरची एक्साईज ड्युटी 50 टक्के कमी करण्याचं कारण आत्ता समजले. शेतकरी, कामगार देशोधडीला लागले आणि ठाकरे सरकारचे प्रमुख नेते डान्स करतायत. दोन वर्षात महाराष्ट्राचं वाटोळं करणारं सरकार कसं जनतेच्या छातीवर नाचतं याचं उदाहरण हा व्हिडिओ आहे, असे राणे त्यांनी म्हंटले आहे.

भाजप नेते निलेश राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे की, “दारू वरची एक्साईज ड्युटी 50% कमी करण्याचं कारण आत्ता समजलं. शेतकरी, कामगार देशोधडीला लागले आणि ठाकरे सरकारचे प्रमुख नेते डान्स करतायत. दोन वर्षात महाराष्ट्राचं वाटोळं करणारं सरकार कसं जनतेच्या छातीवर नाचतं याचं उदाहरण हा व्हिडिओ आहे. या नेत्यांना काही पडली नाही कोणाची,” असे राणे यांनी म्हंटले आहे.

 

शिवसेना खासदार संजय राऊत यांची कन्या पूर्वशी हिचा विवाह ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी होणार आहे. दरम्यान, लग्नापूर्वी एका संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संगीत कार्यक्रमात राऊत व सुळे यांनी केलेल्या डान्सची चांगलीच चर्चा सोशल मीडियावर केली जात आहे.

Leave a Comment