रझा अकादमी हे महाविकास आघाडीचेच चौथे पिल्लू; नितेश राणेंचे राऊतांना प्रत्युत्तर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । त्रिपुरामध्ये मस्जिद पाडल्याच्या कथित घटनेचे पडसाद अमरावतीमध्ये उमटले. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. रझा अकादमी हे भाजपचं पिल्लू आहे, अशी टीका राऊत यांनी केल्यानंतर भाजप नेते नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिले. “दंगल, हिंसाचार घडवण्यामागे रझा अकादमीचाच हात आहे. आणि हे महाविकास आघाडी सरकारचेच चौथे पिल्लू आहे. त्यामुळे उगाच राऊतांनी आमच्यावर आरोप करू नये पहिल्यांदा स्वताचे काय जळते ते पाहावे,”अशी टीका राणे यांनी केली आहे.

भाजप नेते नितेश राणे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, महाराष्ट्रात रझा अकादमी संघटनेद्वारे हिसाचार घडवला जात आहे. आज अमरावतीत जो प्रकार घडला. त्याला पूर्णपणे रझा अकादमी आणि राज्य सरकार जबाबदार आहे. रझा आकादमीच्यावतीने अमरावतीत पत्रके वाटण्यात आलेली आहेत.

अशात महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी माझ्यावर कारवाईची भाषा करण्यापेक्षा दंगल भडकवणाऱ्या रझा अकादमीच्या मुख्य सुत्रधारांना कधी अटक करताय ते सांगावं. नाहीतर येणाऱ्या दिवसांत रझा अकादमीच्या मुंबई कार्यालयावर आम्ही मोर्चा काढणार आहोत, असा इशारा यावेळी राणे यांनी ट्विटच्या माध्यमातून दिला आहे.

महाराष्ट्रातील हिंदूंना घाबरवण्याचा हा प्रयत्न केला जात आहे. त्यांचा आवाज दाबण्याचा त्यांच्यावर दबाव टाकण्याचा हा प्रयत्न केला जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात सांगितले होते की, मी महाराष्ट्रात बेंगॉल पॅटर्न आणू, हाच आहे का मुख्यमंत्र्यांच्या बेंगॉल पॅटर्न? या ठिकाणी सर्व पद्धतीने हिंदूंना दाबले जात आहे. त्यांच्यावर दगडफेक केली जात आहे. आणि अशा परिस्थितीत पोलिसांकडून नुसती बघ्याची भूमिका घेतली जात आहे, असे राणे यांनी म्हंटले.

Leave a Comment