हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणा पासून आपल्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत असलेली अभिनेत्री कंगना राणावत आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यात ट्विटर वॉर रंगल आहे. त्यातच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी धमकावल्याचा आरोप करताना बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली.दरम्यान कंगनाने अजून एक ट्विट करत धमकावणाऱ्यांना थेट आव्हान दिलं. आपण ९ सप्टेंबरला मुंबईत येणार असल्याचे सांगत कोणाच्या बापामध्ये हिंमत असेल तर मला रोखून दाखवा असं कंगनानं म्हटलं होतं. त्यावर संजय राऊत यांनी ट्विट करत मुंबई ही मराठी माणसाच्या बापाचीच आहे असं म्हटलं. आता यावरून भाजपा नेत्यानं शिवसेनेवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.
“मुंबई काय शिवसेनेचा कौटुंबीक प्रदेश आहे का? की त्यांच्या बापाचा प्रदेश आहे? मुंबई भारताचा भाग आहे आणि कोणीही त्या ठिकाणी जाऊ शकतं. जे अशाप्रकराची धमकी देतात त्यांच्याविरोधात कारवाई झाली पाहिजे. तुम्ही कोणालाही खरं बोलण्यापासून रोखू शकत नाही,” असं मत हरियाणाचे गृह आणि आरोग्यमंत्री अनिल विज यांनी व्यक्त केलं. एएनआयनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
मुंबई क्या शिवसेना का खानदानी प्रदेश है, क्या उनके पिता का प्रदेश है? मुंबई भारत का हिस्सा है कोई भी वहां जहां सकता है। जो इस प्रकार की धमकियां देते हैं उनके खिलाफ कार्रवाई होनी चाहिए। आप किसी को सच बोलने से रोक नहीं सकते: हरियाणा के गृह और स्वास्थ्य मंत्री अनिल विज pic.twitter.com/VW8DF5Ymxc
— ANI_HindiNews (@AHindinews) September 5, 2020
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’