आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत गळ्यात हार घालणार नाही; पंकजा मुंडे आक्रमक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मराठा व ओबीसी आरक्षणाच्या मुद्दा उचलून धरत भाजपकडून राज्य सरकारवर टीका केली जात आहे. अशात आज भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आक्रमक पावित्रा घेत जो पर्यंत ओबीसी, मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवत नाही तोपर्यंत आपण हार, फेटा घालणार नसल्याची घोषणा केली.

बीड येथे आज भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आक्रमक पावित्रा घेतला. त्या म्हणाल्या की, ” आम्ही मराठा, ओबीसी समाजातील लोकांना आरक्षण मिळावे म्हणून रात्र दिवस झटत आहोत. जोपर्यंत राज्य सरकारकडून मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय मार्गी लावला जात नाही, तोपर्यंत गळ्यात हार घालणार नाही आणि ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण पूर्ववत होत नाही, तोपर्यंत मला कुणी फेटा बांधायचा नाही. आरक्षणाचा प्रश्न सोडविल्या शिवाय आता गप्प बसणार नाही.”

सोशल इंजिनिअरिंग करणारा जगातील पहिला माणूस कोण असेल तर ते छत्रपती शिवराय आहेत. तेही आपल्या महाराष्ट्रातले आहेत. आमचे वडील आदरणीय गोपीनाथ मुंडे साहेबांना विचारले तुमचे राजकारणातले राजकीय गुरु कोण, तर ते म्हणायचे मी राजकारण करताना छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्य कारभार डोळ्यासमोर ठेवतो.” असेही पंकजा मुंडे यांनी सांगितले.

Leave a Comment