Wednesday, March 29, 2023

मतदानापूर्वीच पंकजा मुंडेंची प्रकृती अचानक बिघडली; ‘आयसोलेट’ होण्याचा घेतला निर्णय

- Advertisement -

बीड ।  राज्यातील विधानपरिषदेच्या 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघासाठी आज (1 डिसेंबर) मतदान पार पडत आहे. मात्र या मतदानापूर्वी माजी मंत्री आणि भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांची प्रकृती बिघडली असून त्यांनी स्वत:ला आयसोलेट करण्याचा निर्णय घेतला आहे. पंकजा या सध्या मुंबईत असल्याचे समजते.

आज पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात मतदान सुरु आहे. त्याच्या आदल्या दिवशीच रात्री पंकजा यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. ”मला सर्दी, खोकला, ताप आहे. यामुळे मी जबाबदारी स्वीकारून आयसोलेट झाले आहे. अर्थाचे अनर्थ करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करावे”, असे आवाहन पंकजा यांनी केले आहे.

- Advertisement -

सर्दी, खोकला, ताप ही सर्व कोरोनाची लक्षण आहेत. पंकजा मुंडेंना ही सर्व लक्षण जाणवू लागल्यानं त्यांनी स्वत:ला isolate केले आहे. मात्र अद्याप त्यांना कोरोनाची लागण झाली आहे की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसेच औरंगाबादमधून शिरीष बोराळकर यांना मत देऊन विजयी करा, असेही त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने अर्थातच महाविकासआघाडीने एकत्रित ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील या नव्या समीकरणांमुळे ही निवडणूक फार चुरशीची बनली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’