पंकजा मुंडेंचा कोरोना टेस्ट रिपोर्ट आला…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । कोरोनाची लक्षणे दिसताच खबरदारी म्हणून भाजप नेत्या आणि राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी आयसोलेट झाल्या होता. या दरम्यान त्यांनी खात्री म्हणून कोरोना चाचणी केली होती. पंकजा याचा कोरोना चाचणी अहवाल आला आहे. पंकजा यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. (corona test is negative)तशी माहिती पंकजा मुंडे यांच्या निकटवर्तींयांकडून देण्यात आली आहे. राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी मतदान पार पडलं. या मतदानापासून पंकजा मुंडे लांब राहिल्या. त्यावेळी अनेक उलटसुलट चर्चा सुरु झाल्या होत्या. त्यावर पंकजा मुंडे यांनी सोमवारी रात्री उशिरा ट्वीट करुन आपण आयसोलेट असल्याची माहिती दिली होती.(Pankaja Munde’s corona test) is negative)

“पंकजा गोपीनाथ मुंडे आपल्याला आव्हान करते की आपण शिरीषजी बोराळकर यांना पहिल्या पसंदीचे मत देऊन विजयी करावे. मला सर्दी खोकला व ताप आहे. त्यामुळे मी जवाबदारी स्वीकारून isolate झाले आहे..अर्थाचे अनर्थ करणाऱ्याकडे दुर्लक्ष करावे आणि बोराळकरांच्या पारड्यात पहिली पसंती टाकावी,” असे ट्वीट पंकजा मुंडे यांनी सोमवारी रात्री 11.31 च्या सुमारास केलं होतं. सर्दी, खोकला, ताप ही सर्व कोरोनाची लक्षण आहेत. पंकजा मुंडेंना ही सर्व लक्षण जाणवू लागल्यानं त्यांनी स्वत:ला isolate केलं होतं.

धनंजय मुंडेंकडून तब्येतीची विचारपूस
सामाजिक न्यायमंत्री आणि पंकजा मुंडे यांचे बंधू धनंजय मुंडे यांनी मंगळवारी पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना तब्येतीची विचारपूस करण्यासाठी फोन केला. यावेळी धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी पंकजा यांना प्रकृतीला काळजी घेण्याचा सल्ला दिला. कोरोना विषाणूचा संभाव्य धोका लक्षात घेऊन त्याबाबतच्या सर्व चाचण्या करून घ्याव्यात, स्वतःची व कुटुंबीयांची काळजी घ्या व लवकर बऱ्या व्हा असा सल्ला धनंजय मुंडे यांनी फोनवरून दिला आहे. तसेच पंकजा मुंडे यांच्या तब्येतीत लवकर सुधारणा व्हावी अशा सदिच्छाही धनंजय मुंडे यांनी व्यक्त केल्या होत्या.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment