भाजपनेत्या पंकजा मुंडेंची प्रकृती अचानक बिघडली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपच्या नेत्या तथा माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्यांकडून महाविकास आघाडी सरकारवर आरोप केले जात आहेत. दरम्यान त्यांनी काल  मंत्री जयंत पाटील व धनंजय मुंडे यांच्यावरही जोरदार टीका केली होती. त्यानंतर आज पंकजा मुंडे यांची अचानक प्रकृती बिघडली आहे. डॉक्टरांनी मुंडे यांना आगामी चार दिवस अरोमा करण्याचा सल्ला दिला आहे.

भाजप नेत्या तथा माजी मंत्री पंकजा मुंडे या नुकसानग्रस्त भागाचा दौरा करत असताना त्यांना अचानक त्रास होऊ लागला.  त्यांच्या घशात फोड आले असल्याने  त्यांना डॉक्टरांनी आगामी चार दिवस बोलणं टाळण्याचा सल्ला दिला आहे. मुंडे यांना घशामध्ये फोड तसेच टॉन्सिल्सचाही त्रास सुरु झाला आहे. आगामी चार दिवसांत पंकजा मुंडे कोणालाही भेटणार नाहीत. तसेच कोणाचेही कॉल स्वीकारणार नाहीत, अशी माहिती पंकजा मुंडे यांनी ट्विटद्वारे दिली आहे.

 

पंकजा मुंडे यांना सध्या घशाचा त्रास सुरु झाला असून त्यांना टॉन्सिल्सचा टॉन्सिलायटीस हा आजार झाला आहे. त्यामुळे आगामी दोन ते चार दिवस न बोलण्याचा सल्ला डॉक्तरांनी मुंडे यांना दिला आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मुंडे आगामी चार दिवस कोणालाही भेटणार नाहीत. दरम्यान मुंडे यांनी यापूर्वी मराठवाडा , नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी केली होती.

Leave a Comment